| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत एका तरूणाने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील पळस्पे फाटा येथे राहणाऱ्या सुफियान कुरेशी (28) या तरुणाने अजिवली हायस्कूल समोर राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीला घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर घेऊन गेला. यावेळी तिच्याशी जवळीक साधून तिच्या सोबत अश्लील वर्तन करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य सुफियानने केले. याबाबतची माहिती या मुलीने आपल्या घरी सांगितली. तिच्या घरच्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुफियान कुरेशी या आरोपीला ताब्यात घेतले आहे.







