| ठाणे | प्रतिनिधी |
टिटवाळा रेल्वे स्टेशनवर तरुणाने एक्स्प्रेस खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय दरेकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणाने वडिलांच्या निधनाचा धक्का बसल्याने टिटवाळा स्टेशनवर एक्स्प्रेस खाली उडी मारत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.