भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

कोळखे येथील महिंद्रा शोरूमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने अपघात झाला. या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन माळगे हा आपल्या मित्रासोबत पनवेल येथे नाश्ता करण्यासाठी जात होता. कोळखे येथील महिंद्रा शोरूमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीसमोर स्वराज गायकवाड हा दुचाकीवरून भरधाव वेगाने आला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालविल्याने ती घसरली. या अपघातात स्वराज गायकवाड याला पाय, छाती व हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या जयेश खरात यालाही गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान स्वराज गायकवाड याचा मृत्यू झाला, तर जयेश खरात याच्यावर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version