रिक्षामधून तोल जाऊन युवकाचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी |

म्हसळा ते माणगाव रोडवर बोर्ले गावच्या हद्दीत रिक्षामधून तोल जाऊन 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, बोर्ले गावच्या हद्दीत आरोपी रिक्षाचालक सुभाष आप्पा शेलार याने त्याचे ताब्यातील ऑटो रिक्षा (एमएच-06-बीव्ही-3869) नाइटने येथून जात असताना स्वतःच्या रिक्षात प्रमाणपेक्षा जास्त एकूण पाच प्रवासी बसून निलेश गणेश डवले (28) रा. नाईटने याला चालकाने त्याचे डावे साइटला बसवले. रिक्षा अतिवेगात, घाईने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवित घेऊन जात असताना बोर्ले गावचे हद्दीत निलेश डवले याचा रिक्षामधून तोल जाऊन तो खाली रोडवर पडून त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो.नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. भोजकर करीत आहेत.

Exit mobile version