विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।
लोणेरे फाटा येथे पन्हळघर रस्त्यावर एका 22 वर्षीय तरुणाला विजेचा शॉक लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना मंगळवारी (दि.6) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला.या घटनेची खबर शेखर शिवाजी टेंबे (वय-24) रा.लक्ष्मी नगर, लोणेरे फाटा, पन्हळघर रोड ता.माणगाव यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.

साहिल शिवाजी टेंबे (वय-22) रा.लक्ष्मी नगर,लोणेरे फाटा,पन्हळघर रोड हा मित्राच्या घरी जेवण करून त्याचा भाऊ व मित्र यांच्या सोबत घरी येत होता. नारायण उमाजी भात्रे यांचे चालू असलेल्या घराच्या बांधकामाजवळ पाण्याच्या पंपाकरिता आणलेल्या चालू लाईटच्या वायरचा त्याला शॉक लागला. त्यात तो मयत झाला.

Exit mobile version