गाढी नदीत तरुणाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पनवेल येथे गाढी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने घडली. विक्रम जमादार (वय 21) असे मयत युवकाचे नाव असून त्याचा मामेभाऊ राजशेखर जमादार याचा शोध सुरू आहे.

पनवेल येथील कमांडर रेनाई या सोसायटीतील गणेशाचे विसर्जन करण्यास ते गेले होते. पाण्याचा जोर आणि खोली याचा अंदाज न आल्याने विक्रम जमादारसह काही युवक बुडाले. हे लक्षात येताच राजशेखर त्यांचा शोध घेत असता तोही बुडाला. याबाबत माहिती मिळताचा तातडीने आपत्कालीन पथक घटनास्थळी आले. त्यांनी काहीजणांना बाहेर काढले; मात्र शेवटपर्यंत जमादार बंधू सापडले नाही.

रात्रीचा अंधार असल्याने शोध घेण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. सकाळी पुन्हा नव्याने शोधकार्य सुरू केल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास विक्रमचा मृतदेह सापडला. मात्र अद्यापपर्यंत राजशेखरला शोधण्यात यश आले नाही. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षण रवींद्र दौंडकर यांनी दिली.

Exit mobile version