। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल कोप्रोली गावातील कमांडर सोसायटी मधील दोन युवक काल उशिरा रात्री गणेश विसर्जन प्रसंगी बुडाल्याने खळबळ माजली आहे. राजशेखर माणिक जमादार,वय -20 आणी विक्रम दिगंबर जमादार-वय 21 अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.स्वतःच्या घरचे विसर्जन आटोपून दोघे कमांडर सोसायटीच्या गणपतीचे विसर्जन होताना ही दुर्दैवी घटना घडली. दोन्ही मृत युवक एकाच कुटुंबातील आहेत. स्वतःची मुले डोळ्या समोर बुडताना पाहण्याचे दुर्दैव या कुटुंबियांना मिळाले. अजूनही सर्वांच्या शोक विलापासह शोध सुरु आहे.
घटनास्थळी उपस्थित पोलीस उप-निरीक्षक बबन सांगळे यांनी विसर्जन प्रसंगी खोल पाण्यात जाऊ नये, उशीरा पर्यंत विसर्जन करू नये असे आवाहन करत उपस्थित कुटुंबियांना सांत्वन करत दिलासा देखील दिला.