| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील कोप्रोली गावातील कमांडर सोसायटीमधील दोन युवक सोमवारी उशिरा रात्री गणेश विसर्जनप्रसंगी बुडाल्याने खळबळ माजली होती. मंगळवारी दुपारी या दोन युवकांचे मृतदेह मिळून आले आहेत.
राजशेखर माणिक जमादार (20) आणि विक्रम दिगंबर जमादार (21) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. स्वतःच्या घरचे विसर्जन आटोपून दोघे कमांडर सोसायटीच्या गणपतीचे विसर्जन होताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यार्नें पनवेल तालुका पोलिसांचे पथक व ग्रामस्थांच्या मदतीने या नदीत बुडालेल्या त्या दोघांचा शोध सुरु होता.