। पनवेल । प्रतिनिधी ।
दुचाकी स्लिप झाल्याने वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सचिन राजेश पवार (रा. ओवळेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दि. 30 ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास सचिन पवार आणि विशाल संजय जाधव हे दुचाकीवरून जात होते. यावेळी विमानतळ रोड, लोखंडी टाकीजवळ, चिंचपाडा ब्रिजकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. या अपघातात सचिन पवार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर विशाल जाधव हा जखमी झाला असून या अपघातात दुचाकीचेदेखील नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
