युवकाचा हृदयविकारामुळे मृत्यू

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
बांदा – मुस्लिमवाडी येथील दानिश शमसुद्दीन पिरजादे (26) या युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहेे. परिसरातील उत्तम क्रिकेटपटू म्हणून परिसरात तो परिचित असून त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version