| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील विळेवरची वाडी येथील तरुण फोनवर बोलता बोलता तोल जाऊन तो जमीनीवर पडला त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला माणगाव रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती माणगाव पोलीसांना कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी तात्काळ आपल्या पोलीस सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली.
माणगाव तालुक्यातील विळे वरचीवाडी येथे सिध्दीविनायक बिल्डींमध्ये राकेश भक्तीपदा संत्रा (32 मुळ रा. मधुबन)शनिवारी (दि. 20) सायंकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास गावाकडील घरातील नातेवाईकांना बोलण्यासाठी सिद्धिविनायक बिल्डिंगचे टेरेसवर गेला आणि मोबाईलवर बोलत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली जमिनीवर पडला. त्यास उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारादरम्यान नले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यूची म्हणून नोंद करण्यात आली आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा श्री. पवार अधिक तपास करीत आहेत.