| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील बोर्ले बौद्धवाडी येथून एक 37 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने बोर्ले गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना शनिवार दि.7 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची फिर्याद सखाराम धोंडू मोहिते (60) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी सखाराम धोंडू मोहिते यांचा बेपत्ता झालेला मुलगा स्वप्नील सखाराम मोहिते (37) रा. बोर्ले बौद्धवाडी ता- माणगाव हा नेहमीप्रमाणे मोलमजुरीचे काम करण्यासाठी जातो असे फिर्यादी यांना सांगून गेला तो अद्यापपर्यंत घरी परतलेला नाही. त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यावर त्याच्या वडलांनी तो हरवल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. बेपत्ता झालेल्या मुलाचे वर्णन रंगाने सावळा, अंगाने सडपातळ, उंची सुमारे 5 फूट असे आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत.
दरम्यान सदरचा बेपत्ता झालेला मुलगा कोणाला आढळल्यास माणगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. (02140-263005) किंवा तापसिक पोलीस हवालदार सानप मोबा-9637286378 यांच्याकडे संपर्क साधावा.







