| महाड | वार्ताहर |
वैद्यकीय उपचारासाठी ठाणे येथे जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेला तरुण उशिरापर्यंत घरी न परतल्याने अखेर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तो हरवल्याची रीतसर तक्रार दाखल केल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रोशन रामचंद्र महाडिक (30), राहणार खर्डी, तालुका महाड, जिल्हा रायगड हा तरुण (दि.5) नोव्हेंबर रोजी घरातून उपचारासाठी ठाणे येथे जात असल्याचे सांगून सकाळी 11:30 चे सुमारास महाड एसटी स्टँडवर गेला. बराच काळ होऊनही तो घरी न परतल्याने त्याचे वडील रामचंद्र शंकर महाडिक (53), राहणार खर्डी-महाड यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत रोशन हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. घरातून बाहेर पडतेवेळी रोशन याने काळ्या रंगाचा हाफशर्ट आणि निळ्या रंगाची फुल जीन्सपॅन्ट परिधान केली असून पायात पांढर्या रंगाची चप्पल आणि सोबत लाल रंगाची बॅग आहे. या तरुणाविषयी जर कोणाला माहिती प्राप्त झाली तर महाड शहर पोलीस ठाण्याशी 8554086125 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास महाड पोलीस करीत आहेत.