सावळे येथून तरूण बेपत्ता

| रसायनी | वार्ताहार |

सावळे गावातील 19 वर्षीय तरूण हरवल्याची घटना घडली असून रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल कैलास माळी (वय 19) उंची 5 फूट, रंगाने गहूवर्णिय, केस काळे, नाक सरळ, चेहरा गोळ, डोळे काळे, असे हरवलेल्या तरूणाचे वर्णन असून कामाला जातो असे सांगून घरातून कुठेतरी निघून गेला आहे. याबाबत आजूबाजूस व नातेवाईकाकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्याबद्दल कैलास माळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोनि अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना के. के. पाटील अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version