। बुलढाणा । प्रतिनिधी ।
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात रात्री क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभात डीजे वर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसन थेट युवाकाच्या हत्येत झाले आहे. यामध्ये चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान राहणार बर्डे प्लॉट, खामगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. बडे प्लॉट भागातील स्मशानभूमीच्या जवळ एका लग्न समारंभामध्ये डीजे सुरू असताना युवक नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असताना त्याचा दुसऱ्या एका युवकाला धक्का लागला, या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील चार ते पाच जणांनी शोएब खान अमीन खान यांच्यासोबत वाद घातला आणि चार ते पाच जणांनी संगणमत करून त्याला ठार मारले. या घटनेचा तपास खामगाव पोलीस करीत आहेत.
खामगांवात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या
