| पाली/बेणसे | वार्ताहर |
पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा सातारा येथील असून पुणे येथे नोकरी करतो. या तरुणाच्या डोक्याला इजा झाली असून, खांदा फॅक्चर झाला आहे. रेस्क्यू टीमचे सदस्य आपदा मित्र, पोलीस व स्वयंसेवक या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका कंपनीचा ग्रुप पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी आला होता. यावेळी सरसगडाच्या मधल्या टप्प्यावर असलेल्या पायऱ्या चढत असताना शेवाळ आलेल्या चिकट झालेल्या पायऱ्यांवरून पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या दरीत कोसळला आणि जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच लागलीच पाली पोलीस, स्थानिक आपदामित्र, वन्य जीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पालीतील स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले. महसूल प्रशासनामार्फत फर्स्ट एड किट पुरवण्यात आले. या तरुणावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले.
सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी
