| कोलाड | प्रतिनिधी |
आधुनिक काळात गणपती उत्सवातील अनेक पारंपारीक खेळ लोप पावत असतांना दिसत आहेत. परंतु, रोहा तालुक्यातील गोवे गावातील तरुणांनी पिढ्यानं पिढ्यापासून सुरु असणारा सारिपाटचा खेळ अजून ही टिकून ठेवला असल्याचे दिसून येत आहे. हा खेळ गणेशात्सवापासून दसऱ्यापर्यंत खेळाला जात असून कोजागिरी पौर्णिमेला या खेळाची समाप्ती केली जाते. गोवे गावातील तिसरी पिढी हा खेळ खेळत असून ही परंपरा 100 वर्षांपासून सुरु आहे.
या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असून, सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्याचा वापर केला जात आहे. लाकडी सोंगट्या पटावर घेऊन हा खेळ सुरु होतो. हा खेळ दोन गटात खेळला जात असून, दोन्ही संघाकडे एकूण 16 (प्रत्येकी 8) सोंगट्या असतात. या खेळात 10 किंवा 25 दान पडल्याशिवाय हा खेळ सुरु होत नाही.
सारिपटाचा एक डाव पूर्ण होण्यासाठी तीन ते चार तास लागतात. पूर्ण जागरण होण्यासाठी दोन ते तीन डाव होतात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ जागरण म्हणून खेळला जातो. गोवे गावातील लिलाधर दहिंबेकर, प्रशांत गुजर, निलेश दहिंबेकर, चंद्रकांत पवार, प्रमोद वारकर, मनोहर दहिंबेकर, बळीराम घरट, नथुराम वारकर, देवजी सुर्वे, यांनी हा खेळ जोपासला संभे येथे हा खेळ खेळला जात आहे.
पूर्वी सारिपाटच्या खेळात जागरण म्हणून तरुण वर्गाचा सहभाग असायचा सध्या मात्र, तरुणांनी या खेळाकडे पाठ फिरवली आहे. संभे गावातील तरुणांप्रमाणे सारिपाट या खेळाकडे वळावे, यामुळे या खेळाची माहिती नवीन
डॉ. मंगेश सानप,
पिढीली मिळेलेल.
सामाजिक कार्यकर्ते, संभे
