राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात राजिप पेझारी शाळेची झेप

। पेझारी। वार्ताहर ।

आगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन यांनी घेतलेल्या विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळालेल्या कु. साईराज सागर म्हात्रे याचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सत्कार केला.

अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यात 2 ते 5 जानेवारी रोजी ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात एकूण दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्यातून बारा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल आदर्श रायगड जिल्हा परिषद शाळा- पेझारी येथील विद्यार्थी कु. साईराज सागर म्हात्रे इयत्ता सातवी याने लिफ्ट नसलेल्या इमारतीत साहित्य तसेच सिलेंडर जिन्यावरून वर चढण्यासाठी महिला व वयस्कर लोकांना सहज शक्य होईल अशी वाहक ट्रॉली तयार केली.

या प्रतिकृतीला (मॉडेल) महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळाला. आस्वाद पाटील माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद, चित्राताई पाटील, माजी अर्थ बांधकाम सभापती, भावनाताई पाटील माजी जि.प.सदस्य, कृष्णा पिंगळा गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती- अलिबाग, सुरेश म्हात्रे अध्यक्ष शाळा विकास समिती, आरती थळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, नितीन पाटील सर मुख्याध्यापक, शिक्षक, वृंद सदस्य, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी साईराज म्हात्रेचे अभिनंदन केले.

Exit mobile version