झेनिथ धबधबा घटना! त्या 8 वर्षांच्या मुलीचा सावरोलीत सापडला मृतदेह

। खोपोली । प्रतिनिधी ।

झेनिथ धबधबा येथे फिरण्यासाठी गेले असता नदीला पाण्याचा लोंढा वाढला. यामध्ये 8 वर्षाची मुली वाहत जात असतानाच तीला वाचविण्यासाठी दोन महिला गेल्या. परंतु दुर्दैवाने त्याही नदीपात्रात वाहून गेल्या. त्यांचे मृतदेह 1 ते 2 किमी अंतरावर मिळाले असून 8 वर्षाच्या आलमा खान हिचा मृतदेह सापडला नव्हता. रात्री अंधारामुळे शोधमोहिम थांबविण्यात आली होती. तर दुसरया दिवशी पोलिस, अपघातग्रस्त टिम आणि अग्निशमन दलाचे जवान शोध मोहीम करीत असतानाच खोपोलीपासून 10 किमी अंतरावर पाताळगंगा नदीवरील सावरोली-खालापूर पुलाजवळील खडकाळ भागात हा मृत्यूदेह आढळून आला.

मंगळवार दि.28 आणि 29 आँक्टोबर रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असतानाच खोपोलीतील स्थानिक 15 लोक झेनिथ धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी गेले होते. दुपारी पावसाचा जोर वाढला व 8 वर्षाची आलमा खान वाहत जात असतानाच तीला वाचविण्यासाठी मेहरबानू खान (वय 40) आणि रुबिना वेळेकर (वय 40) या दोन महिला गेल्या असता त्याही पण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.अपघाग्रस्त टिम वेळेवर घटनास्थळी पोहचून इतर 12 लोकांना रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढले.

Exit mobile version