राजिपचे माजी शिक्षणाधिकारी डी.डी. पाटील यांचे निधन

| खरोशी । वार्ताहर ।

रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी दिनकर दामोदर तथा डी.डी.पाटील यांचे वयाच्या 70 वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यावर पेण येथील वैकुंठधाम स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक व शिक्षक बांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी दोन मुले एक मुलगी नातवंडे आणि जिल्ह्यात मोठा मित्र वर्ग असा परिवार आहे. त्यांनी जिल्ह्यात अनेक शिक्षकांशी स्नेहभावाचे, मैत्रीपूर्ण संबंध जपलेत. आपल्या प्रेमाचा जिव्हाळा लाभलेले अनेक शिक्षक आहेत. अशा भावना उपस्थित शिक्षक बांधवांनी व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारा करिता जिल्ह्यातील शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी माजी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version