जि.प.सभेचे उद्या आयोजन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या तहकूब व नियमित सर्वसाधारण सभेचे बुधवारी 17 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या स्व. ना. ना. पाटील सभागृहात सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवरील रिक्त झालेल्या सदस्य पद भरण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. सदर सभेत बैठक व्यवस्था सोशल डिस्टसिंगचे नियम व मास्क परिधान करून करण्यात येणार आहे. या सभेला फक्त स्थायी समितीचे पदाधिकारी तसेच सदस्य व खाते प्रमुख यांनाच उपस्थित राहता येणार आहे. विषय समित्यांवरील रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सामान्य प्रशासन विभागात व संबंधित पंचायत समिती मध्ये सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत.

Exit mobile version