। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
75 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचा शासकीय ध्वजारोहण समारंभ उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन , क्रीडा व युवक कल्याण , राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा न्यायाधिश विभा इंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, पोलिस अधिक्षक अशोक दुधे आदी उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शिवतिर्थ प्रशासकीय इमारतीत अध्यक्षा योगता पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे ध्वजारोहण करतील. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या प्रांगणात सभापती प्रमोद ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ध्वजारोहण समारंभाप्रसंगी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.