झ्वेरेवचा ‘सुवर्ण’स्ट्रोक

| टोक्यो | वृत्तसंस्था |
पहिल्या ग्रँडस्लॅम पदकपासून दूर असलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव याने जेर्मनीला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. जर्मनीने ऑलिम्पिकमधील टेनिस या खेळामध्ये तब्बल 29 वर्षांनंतर पदक जिंकले. अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव याने करेन खाचानोव याला 6-3, 6-1 अशा फरकाने पराभूत करुन सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. करेन खाचानोव याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. टेनिस प्रकारात जर्मनीला याआधी 1988 साली पदक जिंकण्यात यश आले होते. स्टेफी ग्राफने त्यावेळी हा करिष्मा करुन दाखविला होता.

Exit mobile version