पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. दोन तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणावर मोबाईलचे नेटवर्क बंद पडले आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचा अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून या तिन्ही जिल्ह्यात सर्व नेटवर्क ओपन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आपापल्या क्षेत्रात जर उपलब्ध नेटवर्क मध्ये नेटवर्क बंद असेल तर मॅन्युअल मध्ये एअरटेल किंवा जिओ निवडावे. त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे.