। पुणे । वृत्तसंस्था ।
चिखली जि. बुलडाणा येथील तरुण देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेला कैलास भारत पवार या लष्करी जवानाला वीरमरण आले. ते महार बटालियनमध्ये कार्यरत होते. सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले.कैलास पवार हे गेल्या 2 ऑगस्ट 2020 पासून हिमालय पर्वत रांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्य बजावत होते. आपल्या सहकार्यांसह बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले. उपचारादरम्यान 1 ऑगस्ट रोजी कैलास पवार यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 4 ऑगस्ट लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.