मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार…

I मुंबई I प्रतिनिधी I
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेते उद्या (8 जून रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान लसीकरण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, यांच्यासह राज्यातील विविध प्रश्‍नांवर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान आरक्षणासंदर्भात देखील चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Exit mobile version