अरसिया गोठेकरला मुक्त विद्यापिठाचे सुवर्णपदक

। तळा । वार्ताहर ।
तळा येथील मुस्लिमसमाजातील कु.अरसिया अहमद गोठेकर हिने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक निजामपूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ येथे बीएससी (एम.एल.टी.) शिक्षण पूर्ण केले असून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. या संस्थेत विविध शिक्षणक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा 2 मार्च 2021 ऑनलाईन पद्धतीने 26वा दिक्षांत समारंभ घेण्यात आला होता. परंतु कोरोना महामारी संक्रमण काळात प्रत्यक्ष पदवी दान समारंभाला निर्बंध होते. सदर पदवीदान समारंभ निजामपूर येथे घेण्यात आला. यावेळी कुलगुरू, संस्था चालक, शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत कुलगुरुच्या हस्ते सुवर्णपदक, पदवी प्रमाणपत्र, परितोषीक प्रमाणपत्र धनाकर्ष देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version