उरणमधील कार्यकर्ते शिवसेनेत


उरण | वार्ताहर |
उरण शहरातील मुस्लिम व ख्रिश्‍चन कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी आ.मनोहर भोईर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रवेश करण्यामध्ये ओबेद बक्षी, यासिन मुकादम, कफीद अन्सारी, अकील अन्सारी, वसील अन्सारी, नदीम कर्वेकर, मतीन शेख, बशीर शेख, हुसेन शेख, शाने अहम्मद शेख, हमजा खतीब, लुकास फर्नांडिस, बद्दरुद्दीन फसाटे, सरफराज शेख, जुल्फिकार तुंगेकर, गुफरान शेख, अखिल शेख, शेहनबाज खान, मेहराज शेख, आसिफ कसाई, अब्बास बिबरी, खान आयुब, इमरान अहमद, उपमिर सिद्धीक्की, नबी मुजावर, लतीफ राज, फजल अन्सारी, सुभाष पाटील, जमीर बसिर सय्यद, इबेन हसन अस्नारी, अकील भाई, लुकमान पेंटर, इशरत शेख, शान अहमद खान, अनिता पाटील, शाबीर केलकर, नबी हसन अन्सारी, मोहम्मद भाई, रझाक शेख आदींनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशाच्या वेळी कामगार नेते महादेव घरत, उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक के एम घरत, अल्पसंख्याक सेलचे उरण विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, सय्यद मुस्तफा, इरफान पठाण,डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, कासमभाट शाखाप्रमुख प्रदीप शेळके व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version