| पनवेल | प्रतिनिधी।
45 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील चेन खेचून चोरटा पसार झाला. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विश्वास निघोट हे खांदा कॉलनी सेक्टर 7 येथे राहत असून, एका अनोळखी व्यक्तीने ते रस्त्याने एकटे चालत जात असताना तुम्ही मला धक्का का दिला असे बोलून त्यांची अडवणूक केली. यावेळी निघोट यांनी धक्का दिलेला नसतानाही अज्ञाताने त्यांच्यासोबत वाद घातला आणि दमदाटी केली आणि त्यांची मान पकडून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून तो पळून गेला.






