। पुणे । प्रतिनिधी ।
ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सासवड-जेजुरी टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी घडली. अपघातात चार वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. जेजुरीत पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली. ‘अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान होत आहे. या वारीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. याच वारीतील ट्रक चालकाकडून अनियंत्रित झाला. त्यानंतर हा ट्रक एका दिंडीत घुसला. या दिंडीत महीलांसहित पुरुष वर्ग होता. ट्रकच्या धडकेमुळे अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. याच दिंडीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी वारकऱ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.






