उरण | वार्ताहर |
नवपरिवर्तन संस्थेचे क्रियाशील सदस्य लक्ष्मण ठाकूर यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. त्यानिमित्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लक्ष्मण ठाकूर यांच्या स्मरणार्थ आज द्रोणागिरी गडावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नवपरिवर्तन संस्थेचे नरेश रहालकर, नारायण म्हात्रे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घन:श्याम पाटील, विरेश मोडखरकर, घन:श्याम कडू, रमेश म्हात्रे, दिनेश पाटील, जितेंद्र पाटील, नितेश ठाकूर, प्रज्ञान म्हात्रे, प्रमोद माळी, अजित पाटील, प्रशांत ठाकूर, बॉबी, कुणाल शिसोदिया, आर्यन मोडखरकर आदीं उपस्थित होते.