रायगड जिल्ह्यात 1 हजार 521 रुग्ण; शुन्य मृत्यू

163 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 6 हजार 485 सक्रीय रुग्ण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शनिवार दि. 8 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 521 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 485 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शनिवारी पनवेल महापालिका हद्दीत 1 हजार 022, पनवेल ग्रामीण 129, उरण 18, खालापूर 64, कर्जत 45, पेण 81, अलिबाग 78, मुरुड 5, माणगाव 29, रोहा 18, तळा 1, सुधागड 1, श्रीवर्धन 4, म्हसळा 1, पोलादपूर 4 तर महाड 21 असे 1 हजार 521 रुग्ण आढळले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 79 हजार 690 झाली आहे. यापैकी 1 लाख 68 हजार 613 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 592 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 485 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version