2 हजार 104 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शुक्रवार दि. 21 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 550 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 2 हजार 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 13 हजार 772 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 740, पनवेल ग्रामीण 193, उरण 18, खालापूर 79, कर्जत 28, पेण 115, अलिबाग 124, मुरुड 12, माणगाव 50, रोहा 56, तळा 6, सुधागड 3, श्रीवर्धन 15, म्हसळा 15, पोलादपूर 6 तर महाड 89 असे 1 हजार 550 रुग्ण आढळले. उपचारादरम्यान पनवेल मनपा 3, रोहा 3 आशा सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 097 झाली आहे. यापैकी 1 लाख 86 हजार 705 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 620 वर गेला आहे. सद्यस्थितीत 13 हजार 772 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.