रायगड जिल्ह्यात 1 हजार 714 रुग्ण; दोघांचा मृत्यू

142 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 5 हजार 127 सक्रीय रुग्ण; जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शुक्रवार दि. 7 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 714 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 127 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शुक्रवारी पनवेल महापालिका हद्दीत 1 हजार 187, पनवेल ग्रामीण 206, उरण 32, खालापूर 33, कर्जत 40, पेण 64, अलिबाग 73, मुरुड 5, माणगाव 16, रोहा 22, तळा 2, श्रीवर्धन 2, म्हसळा 5, पोलादपूर 1 तर महाड 26 असे 1 हजार 714 रुग्ण आढळले. फक्त सुधागड तालुक्यामध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 78 हजार 169 झाली आहे. यापैकी 1 लाख 68 हजार 450 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 592 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 127 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version