रमाई योजनेंतर्गत 1 हजार 922 घरे पूर्ण

| अलिबाग | वार्ताहर |

राज्यातील गरीब आणि वंचित असलेल्या घटकांसाठी रमाई ही योजना लागू केली आहे. सात वर्षात जिल्ह्यात शबरी योजनेंतर्गत 3 हजार 697 तर रमाई योजनेंतर्गत 1 हजार 922 घरे पूर्ण झाली आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे अद्याप 2024-25 चे उद्दिष्ट आलेले नाही. कमी उत्पन्न असल्यामुळे हे नागरिक स्वतःचे घर घेऊ शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत या लोकांना कच्च्या घरात किंवा झोपड्यांमध्ये रहावे लागते. या बाबींचा विचार करून शासनाने शबरी योजना लागू केली आहे. रायगड जिल्ह्यात सात वर्षांत रमाई योजनेचे 2,552 घराचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी 2,344 घरे मंजूर होऊन 1,922 घरे पूर्ण झाली आहेत. 422 घराची कामे सुरू आहेत. शबरी योजनेत सात वर्षात 6,610 घराचे उद्दिष्ट आले होते. यापैकी 6,480 घरकुलांना मंजुरी देऊन 3,697 पूर्ण झाली आहेत. 2,783 घरांचा प्रश्‍न विविध कारणांनी रखडला आहे. 2024- 25 सालाचे उद्दिष्ट लोकसभा आचारसंहितेमुळे शासनाकडून आलेले नाही. शबरी, रमाई योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाकडे अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईनही लाभार्थी सादर करु शकतो. जिल्ह्यात योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. 2024 पर्यंत आलेले उद्दिष्ट आचारसंहिता असल्याने शासनाने दिलेले नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Exit mobile version