उरण | वार्ताहर |
सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क नावारूपाला आले आहे. यासाठी सारडे विकास मंचला अमोल तेली यांनी 10 हजारांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे. कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिल्या नंतर त्याठिकाणी केलेलं काम पाहून निसर्ग संवर्धनासाठी इन्टरपोर्ट ग्लोबल लॉजिस्टक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे इम्पोर्ट मॅनेजर अमोल तेली यांनी पाच हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केली होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी पाच हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले आहेत.