दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईत एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 10 वर्षाच्या चिमकुलीवर 30 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलीचे कुटुंब ठाणे येथे वास्तव्यास असून मे महिन्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान करण्यासाठी तिची आई मुंबईत आली होती. यावेळी आईने मुलीला आपल्या बहिणीकडे ठेवले. त्याच दिवशी बहिणीच्या पतीनेही सुट्टी घेतली होती. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या सर्व प्रकारामुळे मुलगी घाबरली होती त्यामुळे तिने ही गोष्ट तिच्या आईपासून लपवून ठेवली होती.

मात्र, यानंतर आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाला आमंत्रित करण्यात आले तेव्हा मुलीने तिथे जाण्यास नकार दिला. याबाबत मुलीला तिच्या आईने विचारले असता तिने आधी घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून मुलीच्या आई वडिलांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार नोंदवली असता पोलिसांनी आरोपीला रविवारी (दि. 28) सकाळी अटक केली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version