| नवी मुंबई | प्रतिनिधी |
उलवे भागातील 23 वर्षीय तरुणीने 14 वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी उलवे पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. उलवे परिसरात राहणाऱ्या मुलाची नवरात्रीमध्ये पीडितेशी गरबा खेळताना ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपीने मुलीसोबत मैत्री वाढवली. 28 ऑक्टोबर रोजी दोघेही कारमधून शिवमंदिरालगत खाडीकिनारी फिरायला गेले होते. यावेळी तरुणाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच कुणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलीने मात्र घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर उलवे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







