कमळगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचा 100 टक्के निकाल

। पनवेल । वार्ताहर ।
कमळगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांच्या दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा केंद्राचा निकाल 100 टक्के लागला आहे. दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजामध्ये एकूण 112 विद्यार्थी, कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालय तळोजा मजकूर येथून 62 विद्यार्थी, तसेच ए.बी. पाटील माध्यमिक विद्यालय तळोजामधून एकूण 18 विद्यार्थी, त्याचप्रमाणे सद्गुरु वामनदादा माध्यमिक विद्यालय तळोजा येथून एकूण 64 विद्यार्थी बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक बबन पाटील, सचिव गणेश बबनदादा पाटील व संचालक मंडळाने अभिनंदन करून या विद्यार्थ्याांठी मेहनत घेणार्‍या शिक्षकांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version