उरणच्या रस्त्यानी घेतले तब्बल १०९८ जणांचे प्राण

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील जेएनपीटी, डि.पी.वल्ड, सिंगापूर स्पोर्ट सह इतर बंदर, कंटेनर यार्ड मध्ये ये-जा करणार्‍या अवजड वाहनानी 1992 पासून आजतागायत 1098 लोकांचा जीव घेतल्याने उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरी अशा मुत्यू पावणार्‍या लोकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जेएनपीटी बंदर, कंटेनर यार्ड, कंटेनर चालक- मालक संघटना, नँसनल हायवे अथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

28 जून 2022 रोजी चिर्ले गावाजवळील रस्त्यावरुन बेशिस्त ट्रेलर चालकांनी कामावर जाणार्‍या मोटारसायकल स्वाराला धडक दिली. झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार चेतन काशिनाथ गावंड या कामगारांला आपले प्राण गमवावे लागले आहे. सदर अपघात एवढा भयानक होता. की चेतनच्या हाडा मासाचे तुकडे अपघात थळी विखुरलेल्या अवस्थेत पडून होते. या अपघाताची माहिती मिळूनही नॅशनल हायवे अथोरिटीची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. सदर अपघात हा ट्रेलर चालकांच्या चुकीमुळे झालेला आहे.असे घटना स्थळी असणार्‍या प्रथम दर्शनी लोकांकडून सांगितले जात आहे.

औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकास होत असताना उरण परिसरातील निष्पाप लोकांना नाहक आपला प्राण गमवावे लागत आहे. सदरचे अपघात हे अनाधिकृत पार्किंगवर, राजरोसपणे रस्त्यावर उभ्या राहणार्‍या वाहनावर, बेशिस्त वाहन चालकांवर आर.टी.ओ, वाहतूक पोलीस यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी सत्यवान भगत यांनी केली आहे.

Exit mobile version