। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील काँग्रेस भवन येथे सुरू असलेल्या सोलापूरच्या भाऊराया हॅण्डलूमच्या हातमाग व यंत्रमाग प्रदर्शन व विक्रीला ग्राहकांच्या उत्स्पूर्त प्रतिसाद लाभत आहे. 1 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. राज्य पातळीवर सोलापूरचे भाऊराया हॅण्डलूम यांच्या हातमाग कापडाने आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनामुळे नावलौकिक मिळविला आहे. रायगड जिल्ह्यात हे प्रदर्शन नावारूपास आले आहे. पावसामध्ये सुती कपड्याचे वापर करणे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरते. सुती कापड हे कापसापासून तयार केलेले कापड पावसामध्ये परिधान केल्यास आपल्याला कापसाचा मुलायमपणा स्पष्ट जाणवू शकतो. ग्राहकांच्या मागणी आणि पसंती याचा विचार करून पनवेलमध्ये सोलापूरच्या भाऊराया हॅण्डलूमच्या हातमाग कापड प्रदर्शन व विक्री सुरु आहे.
या प्रदर्शन व विक्रीमध्ये सोलापूर कॉटनसाडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमीपैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी, शर्ट, कुर्ता, बंडी विविध उत्पादनावर 20 टक्के सुट दिली आहे. या प्रदर्शनाला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आयोजक पांडूरंग पोतन यांनी सांगितले. प्रदर्शन काँग्रेस भवन नित्यानंद मार्ग गोखले सभागृहासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.