कमळ महिला पतपेढीचा ११ टक्के लाभांश जाहीर

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील महिलांची पनवेल येथील कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची 27 वी वार्षिक सभा संस्थेच्या अध्यक्षा मालती आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (23) ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झाली. सन 2021-22 सालाकरिता सभासदांच्या भागभांडवलावर संस्थेने कोरोनामुळे असलेल्या मंदीच्या परिस्थितीतही 11 टक्के लाभांश जाहीर केला.

सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका पूर्वा खेडेकर यांनी, 2021-22मध्ये मृत पावलेल्या सभासद, ठेवीदार व हितचिंतकांना संस्थेतर्फे श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा मालती आंग्रे यांनी, संस्थेच्या संचालिका मंडळ 2022-27 या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्षा विभावरी कुळकर्णी, पूर्वा खेडेकर, पूनम बांदोडकर, उर्मिला वंजारी, अर्चना कुळकर्णी, चित्रा मानकामे, वृंदा वत्सराज, मनीषा विसपुते तसेच सुषमा जांभळे या संचालिका उपस्थित होत्या.

Exit mobile version