वार्षिक सभा खेळीमेळीत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कमळ नागरी सहकारी पतसंस्थेची 30 वी वार्षिक सभा नुकतीच अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये पार पडली. याप्रसंगी सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला. वार्षिक सभेच्या सुरूवातीस सहकार प्रशिक्षण केंद्र, पुणे येथील प्रा.एस.बी.वटाणे यांनी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातून 97 वी घटनादुरूस्ती, त्या अनुषंगाने सहकार कायद्यातील बदल, नियामक मंडळ या सर्वांचा परामर्श घेऊन कमळ पतसंस्था सुदृढ पायावर उभी असल्याचे अधोरेखित केले.
याप्रसंगी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सामाजिक बांधिलकी निधीपोटी निव्वळ नफ्यातून 10 टक्के एवढ्याा रकमेची तरतूद केली गेली. यावेळी कमळ पतसंस्थेकडून जीविविध समाजोपयोगी कामे केली जातात त्याची माहिती देणारी पत्रिका सर्वांना वितरीतकरण्यात आली. कमळ पतसंस्थेने रु.250 कोटी ठेवींचा, रु.172 कोटी कर्जाचा टप्पा ओलांडल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. एकूण 23000 हून अधिक सभासद संख्या असल्याचे सांगून विविध वित्तीय बँकांमध्ये 90 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. कमळ पतसंस्थेच्या सध्या 13 शाखा कार्यरत असून नजिकच्याकाळात कर्जत तालुक्यात नेरळ येथे तर महाड तालुक्यातील बिरवाडी येथे नव्याने शाखा सुरू करीत असल्याचे जाहीर केले.
कमळ पतसंस्थेने सध्या 464 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा ओलांडला असून 31 डिसेंबरपर्यंत 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा संकल्प जाहीर केला. सहकारदर्शन हे पाक्षिक, कमळ वाचनालय, कोकण पतसंस्था फेडरेशन, वृक्षारोपण, महिला बचतगटांना अर्थसहाय्य या उपक्रमांचा तसेच सहयोग गोशाळेस देत असलेल्या भरीव अर्थसहाय्यांचा अध्यक्षांनी उल्लेख केला व केवळ नफा कमविणे हेच उद्दिष्ट न ठेवता आपल्य ासामाजिक दायित्वाबद्दल प्रतिपादन केले.