जिल्ह्यातील 10 तालुक्यात 114 कोरोना रूग्ण

110 कोरोना मुक्त; 641 वर अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 10 तालुक्यामध्ये तब्बल 114 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 641 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 62, पनवेल ग्रामीण 23, उरण 1, खालापूर 4, कर्जत 2, पेण 6, अलिबाग 2, माणगाव 2, श्रीवर्धन 9, म्हसळा 1 आणि महाड 2 असे 114 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 79, पनवेल ग्रामीण 12, उरण 1, पेण 12, अलिबाग 3, म्हसळा 1, तर महाड 2 अशा एकूण 110 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 608 झाली आहे. यापैकी 2 लाख 11 हजार 268 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 699 इतका आहे. सद्यस्थितीत 641 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version