दोघांनी गमावले प्राण; 64 कोरोनामुक्त
अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांची माहिती
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात आज गुरुवार दि.24 जून रोजी कोरोनाच्या 128 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 64 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 839 झाली आहे. यापैकी 448 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 14 हजार 194 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 197 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.