। अलिबाग । वार्ताहर ।
लहान मुलांना त्यांच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन पळवून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून आता म्हसळ्यातील १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली. महिला फिर्यादी रा.संदेरी, ता.म्हसळा यांच्या 13 वर्षांच्या मुलाला त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात कारणावरुन फुस लावुन पळवुन नेले. याबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.