। पेण । प्रतिनिधी ।
पेण बोरगाव आदिवासी वाडीतील कविता सुरेश पवार (13) ही 26 एप्रिलपासुन बेपत्ता आहे. ती हरवल्याची तक्ररी पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कविता पवार हीचे वय 13 वर्षे असून, उंचीने 4 फुट 2 इंच, रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, चेहरा उभा, केस काळे नाक सरळ, अंगात निळया रंगाचा फुलांचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज, पायात चप्पल, सोबत निळ्या-काळ्या रंगाची कपड्याची बॅग आहे. तरी ही मुलगी कुठे आढळल्यास पेण पोलीस ठाणे (02143-252066) येथे संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.