कोरोनामुळे अलिबागच्या 5 वृद्धांचा मृत्यू

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
अलिबाग तालुक्यात आज बुधवार दि.23 जून रोजी कोरोनाच्या 130 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान पाच वृद्ध रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 116 रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
 
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 711 झाली आहे. यापैकी 446 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 14 हजार 130 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 135 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version