जिल्ह्यात 11तालुक्यात 132 कोरोना रूग्ण

39 कोरोना मुक्त; 420 वर अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या
जिल्हा प्रशासनाची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात चार तालुके वगळता सर्वच तालुक्यात कोरोना रुग्ण आढळत असल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. गुरुवारी पनवेल मनपासह, पनवेल ग्रामीण, उरण, खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, श्रीवर्धन, आणि महाड या 11 तालुक्यामध्ये तब्बल 132 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 420 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गुरुवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 82, पनवेल ग्रामीण 17, उरण 1, खालापूर 4, कर्जत 1, पेण 13, अलिबाग 7, मुरुड 1, तळा 1, रोहा 1, श्रीवर्धन 3, आणि महाड 1 असे 132 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 19, पनवेल ग्रामीण 8, खालापूर 4, कर्जत 2, पेण 2, अलिबाग 2, रोहा 2, अशा एकूण 39 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 048 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 930 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 इतका आहे. सद्यस्थितीत 420 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version