रायगड जिल्ह्यात 14 रुग्ण; 11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या 14 नव्या रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने उपचारादरम्यान आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळालाआहे. तब्बल 11 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 8, अलिबाग 2, रोहा 2, सुधागड 1, महाड 1 असे 14 रुग्ण आढळले. पनवेल ग्रामीण, उरण, खालापूर, कर्जत, पेण, मुरुड, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या 11 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 340 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 268 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 690 वर गेला आहे. सद्यस्थितीत 382 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version